[9:55 AM, 1/15/2018] Vinay Thikana: धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमाचं ‘बकेट लिस्ट’ असं या सिनेमाचं नाव असून त्याचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. तेजस देऊस्कर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान हा सिनेमा रीलिज होणार आहे.दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती कऱण्यात येत असून आज माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं पोस्टरही प्रसिद्ध केलं आहे. पोस्टरवरुन माधुरी गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews